मेंडीस "ढेर', भारत "शेर'!
ऐनवेळी ठरलेल्या श्रीलंका दौऱ्यात पूर्वनियोजित डावपेचांच्या जोरावर वन-डे मालिका जिंकून "धोनीच्या धुरंधरां'नी यशोमालिका कायम राखली. युवराज, सेहवाग, गंभीर या अनुभवी खेळाडूंच्या जोडीला काही नवोदितांनी ठसा उमटवला.प्रतीस्पर्धी संघातील एखाद्या खेळाडूने पूर्वी धक्के दिले असले तरी पुन्हा त्याच्याविरुद्ध उभे ठाकताना भारतीय फलंदाज डगमगून कच खात नाहीत, हे सुद्धा या मालिकेतून दिसून आले.
मुकुंद
पोतदार
उपखंडात "शेर', परदेशात "ढेर'! भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि श्रीलंका या इतर दोन संघांवरही अशी टीका होत असते. हे तीन संघ उपखंडातच आणि त्यातही मायदेशात भरात असतात, परदेशात गेल्यानंतर मात्र त्यांना विजय मिळविता येत नाहीत, असे "रेकॉर्ड'च सांगते. पाकिस्तानने इम्रान खानच्या नेतृत्वाखाली, तर भारताने सौरभ गांगुली कर्णधार असताना परदेशात भरीव कामगिरी केली. हे अपवाद सोडल्यास उपखंडातील संघांना परदेशात हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच यश मिळाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत, पाकिस्तान, श्रीलंका या तीन संघांची शेजारच्या देशांमधील कामगिरी सुद्धा फारशी प्रभावी नाही. भारतात कसोटी मालिका जिंकण्यासाठी पाकिस्तानला 1987 पर्यंत वाट पाहावी लागली, तर पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारताला 2001 पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. कोणत्याही देशाविरुद्ध त्यांच्या देशात खेळणे अवघडच असते. त्यातही श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात खेळताना अनेक मातब्बर संघ पराभूत झाल्याचे दिसून येते. अशावेळी श्रीलंका दौऱ्यात भारताने सलग दुसऱ्यांदा वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंचा संघ एकमेकांविरुद्ध खेळत असतो. असे असले तरी प्रत्यक्षात दोन-तीन प्रमुख खेळाडूंमध्ये निर्णायक लढत असते. प्रमुख खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलायचा आणि इतरांनी खारीचा वाटा उचलून त्यांना साथ द्यायची असते. यालाच "टीम गेम' अर्थात सांघिक कामगिरी म्हणतात. प्रमुख खेळाडू ढेपाळले तर संघाला मोठा धक्का बसू शकतो. एखादा संघ गोलंदाजीत प्रबळ असेल तर ती त्यांची जमेची बाजू असते. गोलंदाजीच्या जोरावर प्रतीस्पर्धी संघाच्या फलंदाजांची कोंडी करण्याचे डावपेच लढविले जातात.मेंडीस विरुद्ध भारताचे "स्ट्रोकप्लेयर'यासंदर्भात या मालिकेपूर्वी सर्वांची चर्चा एकाच खेळाडूविषयी होत होती. एक नाव बरेच गाजत होते आणि ते होते अजंता मेंडीसचे. वास्तविक मुथय्या मुरलीधरन हा श्रीलंकेचे "ट्रंप कार्ड' आहे. पण मेंडीस हाच त्यांचा "स्ट्राईक बोलर' बनला आहे. वास्तविक मेंडीसला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून एक वर्षही पूर्ण झालेले नाही. मात्र मागील वर्षी आशिया करंडक स्पर्धेत तसेच श्रीलंका दौऱ्यात त्याची गोलंदाजी खेळताना भारतीय फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली. वास्तविक भारतीय गोलंदाज मायदेशातील फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजी सहज खेळून काढण्यात तरबेज असतात. भारतीय फलंदाजांनी शेन वॉर्न याच्यासारख्या मातब्बर लेगस्पीनरला क्वचित डोके वर काढू दिले. अशावेळी एखादा नवखा फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांची कोंडी करतो, याचे कोडे सर्वांनाच चक्रावून टाकणारे होते. भारताच्या भल्याभल्या "स्ट्रोकप्लेयर'ना मेंडीसच्या चेंडूंचा अंदाजच आला नाही आणि त्यांची दांडी गुल झाली.या पार्श्वभूमीवर मेंडीस विरुद्ध भारताचे "स्ट्रोकप्लेयर' असाच या मालिकेतील निर्णायक मुकाबला होता. जेव्हा एखाद्या संघाचे "ट्रंप कार्ड' भरात असते, तेव्हा त्याचे अस्त्र प्रतीस्पर्धी संघ कसे परतावून लावतो, यावर मालिकेचा निकाल अवलंबून असतो. भारतीय फलंदाजांनी या आघाडीवर बराच "होमवर्क' केल्याचे दिसून आले. मागील मालिकेत युवराजला मेंडीसने तीन वेळा बाद केले होते. युवराज केवळ 72 धावा करू शकला होता. त्या मालिकेतील अपयशानंतरच त्याची संघातून गच्छंती झाली होती. मात्र युवराजने नेटमध्ये कठोर मेहनत केली. याशिवाय त्याने "जिम'मध्ये जाऊन वजनही कमी केले. इंग्लंडविरुद्ध त्याने धडाकेबाज पुनरागमन केले. मात्र तेव्हा तो मायदेशातील "पाटा' खेळपट्ट्यांवर खेळत होता. यावेळी मेंडीसविरुद्ध त्याच्याच "गुहे'त शिरून विजयाचा घास घ्यायचा होता. साहजिकच युवराजच नव्हे तर सर्वच भारतीय फलंदाजांची कसोटी होती.पाकिस्तानचा दौरा रद्द झाल्यामुळे श्रीलंकेचा दौरा ऐनवेळी ठरविण्यात आला होता. असे असले तरी एकदा लंकेला जायचे ठरल्यानंतर "टीम इंडिया'ने अजंता मेंडिसनामक "भूत' गाडायचा निर्धार केला आणि त्यादृष्टिने नियोजन केले. मेंडीसच्या शैली आणि तंत्राचे "पोस्टमार्टेम' करण्यात आले. त्यातून "मार्गदर्शक तत्त्वे' आखण्यात आली. पहिली गोष्ट म्हणजे मेंडीस हा फिरकी गोलंदाज असला तरी तो मध्यमगती गोलंदाज आहे, असे समजून त्याचा मारा खेळायचे ठरले. "फ्रंट फूट' तिरक्या रेषेत न नेता सरळ टाकायचे ठरले. फिरकी गोलंदाजाचे चेंडू तटविण्यासाठी अनेकदा पॅडचा वापर केला जातो. क्रिकेटच्या परिभाषेत त्यास "पॅडिंग' करणे असे म्हटले जाते. मात्र "पॅडिंग' चुकले की, फलंदाज पायचीत होत असतात. फिरकी गोलंदाजीविरुद्ध असेच चकण्याचा धोका असतो. अशावेळी "पॅड'चा वापरच करायचा नाही, "बॅट'नेच खेळायचे ठरले.सचिनच्या अनुभवाचा फायदाएखाद्या संघाच्या धोरणात्मक नियोजनात प्रमुख खेळाडू आपला विपुल अनुभव कसा "अप्लाय' करतात, त्यासाठी किती पुढाकार घेतात आणि काय युक्त्या लढवितात, हे महत्त्वाचे असते. मागील मालिकेत सचिन तेंडुलकर खेळू शकला नव्हता. यावेळी त्याची उपस्थिती निर्णायक ठरली. खरे तर तिन्ही वेळा सचिनला पंचांनी "बाद' केले. तरीही सचिनचा नुसता सहभाग संघासाठी प्रेरणादायी ठरला. तिसऱ्या सामन्यात घणाघाती शतक झळकाविल्यानंतर युवराजने सचिनला मानवंदना दिली. नंतर मेंडीसचे अस्त्र निष्प्रभ करण्यासाठी सचिनच्या "टिप्स' उपयुक्त ठरल्याचेही युवराजने कृतज्ञतापूर्वक नमूद केले. यावरून सचिनचा अनुभव किती बहुमोल आहे, हे स्पष्ट होते.तिसऱ्या सामन्यात युवराजचा धडाका सुरू असताना वीरेंद्र सेहवाग "नॉन-स्ट्राईक'ला होता. सेहवागच्या वाट्याला फार कमी चेंडू येत होते. गोलंदाजीवर एकहाती हुकूमत राखण्याची सवय असलेल्या आक्रमक फलंदाजांना अशावेळी संयम राखणे फार अवघड जाते. मोठ्या "ब्रेक'नंतर "स्ट्राईक' मिळाल्यास या फलंदाजांची एकाग्रता ढळते आणि ते बाद होतात, असे दिसून येते. या संदर्भात सेहवागनेही "युवी'च्या जोडीला झळकाविलेले शतक कौतुकास्पद ठरते.गंभीरचे सातत्यभारतीय संघात अनेक शैलीदार फलंदाज आहेत. सचिन, सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्या तुलनेत गंभीरला तेवढा "करिष्मा' नाही. मात्र गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून गंभीरने राखलेले सातत्य अतुलनीय आहे. या मालिकेतही त्याने एका दिडशतकासह सुमारे पावणेतीनशे धावा काढल्या. "मिस्टर डीपेंडेबल' असा लौकिक गंभीर निर्माण करीत आहे आणि तो टिकवीत सुद्धा आहे!इशांत, प्रविणची चमकयावेळी सचिन उपलब्ध असला तरी प्रमुख फिरकी गोलंदाज हरभजनसिंग तंदुरुस्त नव्हता. हरभजनला पुन्हा फॉर्म गवसला आहेच. याशिवाय "आयपीएल'मध्ये एस. श्रीशांतच्या श्रीमुखात भडकावलेल्या "भडकू भज्जी'ने स्वतःच्या वर्तनातही सुधारणा केली आहे. हरभजन नसल्यामुळे वेगवान गोलंदाजांवर मदार होती. कारकिर्दीत सर्वाधिक भरात असलेल्या झहीरला तीन सामन्यांत तीनच बळी मिळाले. मात्र इशांत शर्माने पाच सामन्यांत दहा बळी टिपले. प्रवीण कुमार याने पाच बळी मिळविले. इरफान पठाण यानेही उपयुक्त कामगिरी केली. संघाचा "अविभाज्य घटक' म्हणून इरफानला स्वतःचे स्थान पुन्हा भक्कम करायचे आहे. यावेळी गोलंदाजीत त्याची कामगिरी दिलासा देणारी ठरली.नवोदितांचा ठसाया दौऱ्यात काही नवोदितांना भारताने संधी दिली होती. कोणत्याही संघाची "दुसरी फळी' किंवा "बेंच स्ट्रेंथ' भक्कम असावी लागते. त्यामुळे काही नवोदितांच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष्य होते. अनिल कुंबळेची निवृत्ती, हरभजनची अनुपलब्धता असे असताना प्रग्यान ओझा हा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. त्याने चार सामन्यांत सात बळी मिळवून प्रभावी कामगिरी केली. रणजी मोसमात सौराष्ट्राने भरीव कामगिरी केली. यात रवींद्र जडेजा याचा मोलाचा वाटा होता. ओझाप्रमाणेच जडेजानेही "आयपीएल'द्वारे लक्ष्य वेधून घेतले होते. जडेजाला एकाच सामन्यात संधी मिळाली आणि त्याचा फायदा उठवीत त्याने अर्धशतकी खेळी केली. या तुलनेत सुरेश रैना (पाच सामन्यांत एकाच अर्धशतकासह 141 धावा) आणि रोहित शर्मा (तीन सामन्यांत 44) यांना संधीचा फायदा उठविता आला नाही."पूर्वपुण्याई नही चलेंगी'!"एक शतक काढा आणि पंचवार्षिक योजनेप्रमाणे पाच वर्षे निश्चींत राहा' असे भारतीय क्रिकेटचे "अलिखित समीकरण' होते. मात्र आता "पूर्वपुण्याई'च्या जोरावर कुणालाही संघातील स्थान अबाधित राखता येत नाही. संघातील प्रत्येक स्थानासाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. अशावेळी एखाद्या सामन्यातील अपयश संघातील स्थान जाण्यास काणीभूत ठरू शकते. संघाची कामगिरी म्हणूनच उंचावली आहे.धोनीचे नेतृत्वसौरभ गांगुलीने "जशास तसे' या नीतीच्या जोरावर आक्रमक नेतृत्व करून "टीम इंडिया'च्या यशाचा पाया रचला. आता धोनीच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली "टीम इंडिया' आणखी बहरली आहे. श्रीलंकेतील कामगिरीचे अजित वाडेकर, अंशुमन गायकवाड, संदीप पाटील, मदन लाल अशा खेळाडूंनी कौतुक केले आहे. भारताच्या माजी कसोटीपटूंनी दिलेली शाबासकी "धोनीच्या धुरंधरां'साठी महत्त्वाची आहेच. मात्र अर्जुन रणतुंगा, इयन चॅपेल, शेन वॉर्न अशा इतर देशांच्या माजी कसोटीपटूंनी धोनीच्या नेतृत्वगुणांना "सर्टिफिकेट' दिले आहे आणि ते जास्त महत्त्वाचे आहे. याचे कारण प्रतीस्पर्धी देशाचे तज्ज्ञ दुसऱ्या संघांचे कौतुक असे सहजासहजी करीत नसतात.आता लक्ष्य "किवी'सुरवातीलाच उल्लेख केल्या त्याप्रमाणे परदेशात "ढेर' हा कलंक पुसून काढणे भारतीय संघाला आवश्यक आहे. "नंबर वन' बनण्यासाठी भारताला परदेशात प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध विजय मिळविणे अनिवार्य आहे. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळविण्याचे ध्येय "टीम इंडिया'ला आखून दिले आहे. ही वाटचाल लवकरच सुरू होणार असून न्यूझीलंड दौरा जवळ आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात न्यूझीलंडला कसोटी मालिकेत पराभूत व्हावे लागले, मात्र वन-डेमध्ये "किवी' कांगारूंना भारी पडले.-----
Monday, February 9, 2009
Friday, January 9, 2009
ब्लॉग'चालकांचे "कमबॅक'
ब्लॉग'चालकांचे "कमबॅक'
आज, बऱ्याच दिवसांनी स्वतःच्याच ब्लॉगकडे लक्ष दिले आहे. इतके दिवस जणू काही ढुंकूनही पाहिले नव्हते. जणू काही कशाला? खरे तर नाहीच!सहा जानेवारी रोजी पाने लावण्याच्या (वृत्तपत्रांची तुम्ही वाचता त्या पानांची रचना संगणकावर तयार करणे) गडबडीत असतानाच राजेश ओझा याचा फोन आला. राजेशची बोलण्याची एक जबरदस्त शैली आहे. आम्ही पत्रकार मंडळी "शुद्ध' बोलतो, असे कौतूक नेहमी ऐकायची सवय होऊन गेली आहे. मात्र राजेशचे बोलणे पत्रकारच नव्हे तर साहित्यीकांनाही लाजवणारे असते. राजस्थानी असूनही त्याने शुद्ध मराठीत लग्नाचे आमंत्रण दिले. मुलीचे नाव "भारती सासवडकर' असल्याचे तो म्हणाला.
गुप्ते मंगल कार्यालय हे आमच्या घराच्या जवळच असलेले केसरीवाड्यासमोरील कार्यालय तसे पाहिले तर आम्हा क्रीडा पत्रकारांसाठी "बुद्धिबळ स्पर्धांच्या आयोजनाचे ठिकाण' म्हणून प्रसिद्ध आहे. "काय योगायोग म्हणायचा. बुद्धिबळपटूचे लग्न त्याच्याच खेळाच्या स्पर्धा होतात, त्याच ठिकाणी,' असा विचार फोन सुरू असतानाच मनात आला. पुन्हा एकदा राजेशचे अभिनंदन केले आणि नक्की येतो, असे "प्रॉमिस' करीत त्याला शुभेच्छाही दिल्या.
वृत्तपत्रात संध्याकाळी पाने लावण्याची वेळ भयंकर (!) असते. राजेशचे अभिनंदन केले आणि मोबाईल बंद केला. कामाची भीषण (!) वेळ असूनही आधी राजेशचा नंबर सेव्ह केला. (अलिकडेच दुसरा मोबाईल हॅंडसेट हरविल्यामुळे असे फोन येत जातात, तसे नंबर सेव्ह करीत जात असतो...) नंबर सेव्ह केल्यावर "रिमाईंडर' सुद्धा लावले. नऊ तारखेचे लग्न चुकवून चालणार नव्हते.ंनंतर काम करून, घरी जाऊन, जेवण करून झोपलो सुद्धा!!!! सकाळी उठल्यावर बायकोला सांगितले की, नऊ तारखेला सकाळी मी जेवायला नसेन. एक लग्न आहे.
तोपर्यंत सुद्धा ट्यूब पेटली नव्हती. मात्र अचानक माझ्यातील पत्रकार जागा झाला. मी विचार केला, अरे हा राजेश तर दृष्टिहीन आहे. याच्याशी कोण मुलगी लग्नाला तयार झाली? असा प्रश्न पडला. मी म्हटले तो दृष्टिहीन असल्यामुळे मुलगी सुद्धा दृष्टिहीनच असेल. तरि सुद्धा उत्सुकता होती. मात्र थेट त्याला कसे विचारायचे, हा प्रश्न होता.
त्यामुळे मी त्याचे प्रशिक्षक जोसेफ डीसुझा यांना फोन केला.जोसेफ यांच्याशी बोलताना मग मला "बातमी' कळली. त्यांनी सांगितले की, भारतीचे वडील अंध होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. भारती त्यांच्या स्मरणार्थ अंध बुद्धिबळ खेळाडूंची स्पर्धा आयोजित करीत असते. लगेच त्यांच्याकडून भारतीचा नंबर घेतला. भारतीशी बोललो आणि मग त्यातूनच ही बातमी तयार झाली.
क्रीडा पत्रकार असूनही मी काही वेगळ्या विषयांवर लिहीले आहे किंबहुना योगायोगाने तसे लिहीण्याची संधी मिळाली. याविषयी पुन्हा केव्हा तरी...अरे नाही, नाही, केव्हा तरी नाही, आता नियमीतपणे "ब्लॉग चालक-मालक-मुद्रक-प्रकाशक-संस्थापक' हे पद (की पदावळी) सार्थ ठरविण्याचा संकल्प केला आहे. (याचा आणि नव्याने सुरू झालेल्या 2009चा काहीही संबंध नाही, याची नोंद घ्यावी!!!!)
"डोळस' विवाहदृष्टिहीन तरुणाला निवडले जीवनाचा साथीदारभारतीचा निर्णय : येत्या शुक्रवारी पुण्यात विवाहबद्ध होणार मुकुंद पोतदार : सकाळ वृत्तसेवापुणे, ता. 7 ः "तो' एक दृष्टिहीन... आणि "ती' चांगली डोळस...; मात्र "दृष्टी' चारचौघांहून वेगळी. दृष्टिहिनांसाठी काम करणाऱ्या वडिलांचा वारसा अंगात भिनलेला. त्यामुळे दृष्टिहीनता हे वैगुण्य न समजता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजेश ओझाच्या "ती' प्रेमात पडली. राजेशचा स्वाभिमान तिला भावला आणि त्याच्याशी जन्माची सोबत करण्याचा निर्णय तिने घेतला. आता 9 जानेवारीला ते विवाहबद्ध होत आहेत. पुण्याच्या भारती सासवडकरची ही कहाणी...भारतीचे वडील सखाराम सासवडकर "एसकेएफ'मध्ये नोकरी करायचे. दृष्टिहीन असूनही, ते फार सक्रिय असायचे. त्यांनी दृष्टिहीन कलाकारांचा वाद्यवृंद सुरू केला होता. त्यानिमित्त सासवडकरांच्या घरी दृष्टिहीन कलाकार, अन्य दृष्टिहिनांचे येणे-जाणे होते. त्यांची जिद्द पाहतच भारती मोठी झाली. त्यांच्यासाठी चाललेल्या कार्यातही सहभागी होऊ लागली. सखाराम बुद्धिबळ स्पर्धांत भाग घ्यायचे. त्यांचे 2001 मध्ये हृदयविकारामुळे निधन झाले. भारतीसाठी हा मोठाच धक्का होता; मात्र वडिलांचे छत्र हरपले, तरी त्यांचे कार्य थांबू द्यायचे नाही, हा निर्धार तिने केला. दुसरीकडे ती कायद्याचे शिक्षणही घेत होती. 2002 मध्ये तिने वडिलांच्या स्मृत्यर्थ दृष्टिहिनांची बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली. त्यात राजेश सहभागी झाला. राजेशबरोबर अशा प्रकारे झालेली ओळख वाढली आणि ती त्याच्या प्रेमात पडली.राजेशविषयी ती सांगते, ""तो दृष्टिहीन असला, तरी स्वाभिमानी आहे; उपकार म्हणून केलेली मदत तो स्वीकारत नाही. अनेकांनी नोकरीचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसली, तरी तो हात-पाय गाळून बसला नाही. त्याने स्वतः बुद्धिबळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्याचा हा गुण मला आवडला.'' राजेशला वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत दिसत होते; मात्र मोतीबिंदूचा त्रास झाला. परिणामी त्याला शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. लहान वयात नेत्रपटल नाजूक असल्यामुळे शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. आधी एक आणि मग दीड वर्षाने दुसरा असे दोन्ही डोळे गमावल्यामुळे राजेशवर आकाश कोसळले. त्याचे वडील मफतलालसुद्धा खचून गेले; मात्र एके दिवशी वृत्तपत्रात त्यांनी नाशिकमधील दृष्टिहिनांच्या बुद्धिबळ स्पर्धेची बातमी वाचली. ते राजेशला म्हणाले, ""बघ, दृष्टिहीन मुले बुद्धिबळ खेळू शकतात. आपण करायचा का प्रयत्न?'' "इच्छा तेथे मार्ग' या उक्तीची मफतलाल यांना प्रचिती आली. त्यांच्याच सोमवार पेठ भागात राहणारे बुद्धिबळाचे प्रशिक्षक जोसेफ डिसूझा यांचे नाव त्यांना कळले. डिसूझा यांनी राजेशला हा खेळ शिकविण्याचे आव्हान स्वीकारले. तेव्हा डोळस मुलांचा प्रशिक्षण वर्ग जोरात चालत असतानाही त्यांनी राजेशला दाखल करून घेतले.राजेशने कारकिर्दीत आतापर्यंत राष्ट्रीय विजेतेपद मिळविले असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धांतही भाग घेतला आहे. पुरस्कर्त्यांच्या मदतीशिवाय त्याने कारकीर्द केली. दृष्टिहीन आणि यश मिळविलेला खेळाडू अशा निकषांवर त्याला नोकरीची आशा होती; मात्र याविषयी कटू अनुभव आल्यामुळे त्याने स्वतः प्रशिक्षण वर्ग सुरू केला. सोमवार पेठ, वानवडी आणि हडपसर अशा ठिकाणी तो शिकवितो. त्याला तेथे गाडीवरून नेण्या-आणण्याबरोबरच क्लास चालविण्यातही भारती त्याला मदत करते.
Tuesday, August 21, 2007
"चक दे' ची चर्चा!
"चक दे' ची चर्चा!"चक दे इंडिया' पाहिल्यानंतर मी बऱ्याच परिचित मंडळींना "एसएमएस' केला. "चक दे इंडिया' जरूर पाहा. पोराबाळांनाही घेऊन जा, असा हा "एसएमएस' होता. विशेष म्हणजे "एसएमएस' "सेंड टू मेनी' या ऑप्शनमधून पाठवित असतानाच काही जणांचे रिप्लाय आले.
यात "ओके,' "थॅंक्स', "नक्की बघतो,' असा प्रतिसाद होता. यावरून या चित्रपटाविषयी उत्सुकता होती, हे जाणवले.ज्या मंडळींना "एसएमएस' पाठविले, त्यातील बऱ्याच जणांनी "चक दे' पाहिला. पाहिलेल्यांचा प्रतिसादही मिळत आहे. माझ्या पी. डी. देशमुख नावाच्या मित्राने तर सिनेमा सुरू असताना इंटर्व्हल व्हायच्या आधीच "chak de pahtoy..keval chan! असा "एसएमएस' पाठविला. राहूल जोशी नावाच्या मित्राने तर इंटर्व्हलमध्ये बाहेर आल्यानंतर थेट फोन केला. "मुकुंद, अरे फार मस्त आहे सिनेमा. मी एकटा पाहतोय. पण शक्य झाल्यास आजच रात्री घरच्या सगळ्यांना घेऊन पुन्हा पाहणार आहे.' जयंत महाबोले यानेही "चक दे' आवडल्याचे एसएमएस द्वारे कळविले.या सिनेमाचे परिक्षण मी "सकाळ'मध्ये लिहीले आहे. आमचा प्रुफरिडर असित हा त्याचा पहिला वाचक. या बहाद्दराने परिक्षण वाचले, त्याला आवडले, त्याने तिकीट काढले, त्याने सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून त्यानेच मला हे सांगितले की, तुझे परिक्षण वाचूनच मी "चक दे' पाहायचे ठरविले!
हेच परिक्षण वाचून आशिष चांदोरकर हा आमचा हॉकीप्रेमी सहकारी सुद्धा "चक दे' पाहणार आहे. त्याच्या रिस्पॉन्सची मला प्रतिक्षा आहे.
तसे पाहिले तर प्रत्यक्ष "चक दे'चा पहून पहिला "रीस्पॉन्स' "मामू' उर्फ श्रीपाद ब्रह्मेकडून आला. परिक्षण द्यायचे नसले तरी त्याने स्वखर्चाने तिकीट काढून "फर्स्ट डे फर्स्ट शो'ला "चक दे' पाहिला. तो सुद्धा भारावून गेला होता.एकंदरीत "चक दे'ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा चित्रपट यापुढेही गाजेल, याचे कारण "माऊथ पब्लीसीटी'! आता "चक दे' ऑस्करसाठी जावा आणि इतकेच नव्हे तर त्याला "ऑस्कर'ही मिळावे, हीच सदिच्छा!

Sunday, August 12, 2007
Second Best Thing In Indian Hockey!
I won't forget the day Friday, 10 Aug. 2007. I watched the movie `Chak De India'. 1st day! 1st show!! I was experiencing this `1st' thing for the very 1st time in my life!
Now I can tell u that it is a very very good movie. In fact I am very proud that I watched `Chak De' on 1st day, 1st show!! King Khan has done a tremendous job. Actyally this film will be termed as a major milestone for Shahrukh. For the other actors i.e. all the players this will be a stepping-stone. And what a tremendous start they have got! Banner is Yashraj Films. Producer is Aditya Chopra. Director is Shimit Amin. What more they can ask?
Whole film is thrilling. Here we have to take into account that `Chak De' is based on Hockey. Hockey? yeah..Hockey, Our Official National Game, the game which gave us the Magician named Major Dhyanchand. This is the same game which brought Olympic Glory.
But sadly all changed & hockey lost it's glory, glamour. In such a situation `Chak De' has come. I think after Major Dhyanchand, whose birth-day 29th August is celebrated as Sports Day, `Chak De' is the second best thing to have happend to Indian Hockey.

News Published in Sakal on 11th August, 2007
चक दे'फेम मुलींचा
खऱ्या खेळाडूंशी सामना!
मुंबई, ता. 10 (पीटीआय) ः "चक दे इंडिया' चित्रपटात महिला हॉकीपटूंची भूमिका केलेल्या मुली आणि भारताच्या खऱ्याखुऱ्या महिला हॉकी संघातील खेळाडू यांच्यात एक प्रदर्शनी सामना आयोजित करण्याचा विचार असल्याचे भारताचे माजी गोलरक्षक मीररंजन नेगी यांनी सांगितले.त्यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेला "चक दे' आज प्रदर्शित झाला.
चित्रपटात मुख्य भूमिका असलेला शाहरुख खान, तसेच महिला हॉकीपटूंची भूमिका केलेल्या मुलींना त्यांनी प्रशिक्षण दिले. याविषयी ते म्हणाले की, ""लवकरच असा सामना घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. मी कलाकारांना प्रशिक्षण द्यायला सुरवात केली तेव्हा त्यांना हॉकीविषयीच नव्हे तर मैदानावर साधे धावण्याविषयीसुद्धा कल्पना नव्हती. मात्र "चक दे' पाहिल्यानंतर या मुलींनी हॉकी किती छान आत्मसात केली आहे, हे तुमच्या लक्षात येईल. त्यांनी हा चमत्कार कसा केला याचे आश्चर्य वाटते. या मुली हॉकी खरोखरच चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या मुली आपल्या राष्ट्रीय संघातील खेळाडूंना नक्कीच चांगली लढत देऊ शकतील. प्रदर्शनी सामन्यातही त्यांना मान खाली घालावी लागणार नाही. त्यामुळेच मी हा सामना आयोजित करण्यासाठी गांभीर्याने विचार करतो आहे.'
मुलींच्या संघाने पुरुष संघाविरुद्ध सामना खेळल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. चित्रपटातील मुली मणीपूर, दिल्ली, पंजाब, उत्तरांचल, महाराष्ट्र, अशा ठिकाणी राहणाऱ्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. चित्रपटातील कलाकारांप्रमाणेच खऱ्या खेळाडूंना सवलती मिळतील आणि हॉकीत पुन्हा यशोमालिका सुरू होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. "सिटी लिमोसीन'ने आर्थिक पुरस्कार दिल्यामुळे महिला हॉकीचे चित्र बदलेल, असेही ते म्हणाले.
----

News Published in Sakal on 9th August, 2007
"चक दे इंडिया'चा आज
लंडनमध्ये प्रीमिअर
लंडन, ता. 8 (पीटीआय) ः लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेल्या "चक दे इंडिया' या बहुचर्चित चित्रपटाचा जागतिक प्रीमिअर उद्या येथील सॉमरसेट हाउसमध्ये होत आहे. भारताचे माजी गोलरक्षक मीररंजन नेगी यांच्या कारकिर्दीवर आधारित असलेल्या या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
शाहरुखच्या जोडीला विद्या माळवदे ही अभिनेत्री चित्रपटात झळकत आहे. शिमीत अमीन दिग्दर्शक, तर आदित्य चोप्रा निर्माते आहेत. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न, सिडनी, ब्रिस्बेन या शहरांत चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
"प्रीमिअर'ला सुमारे दोन हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचा प्रीमिअर लंडनमध्ये होत असल्याबद्दल लंडनचे महापौर केन लिव्हिंगस्टोन यांनी आनंद व्यक्त केला.
-----

Interview of Negi on the day of release of `Chak De India'
शाहरुखमुळे मुलांच्या हाती
पुन्हा हॉकी स्टिक दिसतील ः नेगी
मुकुंद पोतदार
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. 9 ः ""शाहरुख खान आजघडीचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्यामुळे हॉकीचे सुवर्णवैभव पुन्हा निर्माण होण्यास नक्कीच चालना मिळेल,'' अशी भावना भारताचे माजी गोलरक्षक आणि महिला संघाचे माजी प्रशिक्षक मीररंजन नेगी यांनी व्यक्त केली. "अगर शाहरुख हॉकी का स्टिक अपने हात में पकडें, तो सारे देश के बच्चे फिरसे हॉकी जरूर खेलने लगेंगे,' अशी उत्स्फूर्त भावनाही त्यांनी व्यक्त केली.
शाहरुखची मुख्य भूमिका असलेला "चक दे इंडिया' हा चित्रपट उद्या देशभर प्रदर्शित होत आहे. नेगी यांच्या कारकिर्दीवर आधारित या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यानिमित्त संपर्क साधला असता ते म्हणाले, ""माझी कारकीर्द संपली आहे. मला पुन्हा "इनिंग' खेळता येणार नाही; पण माझ्या खेळाची "इनिंग' पुन्हा सुरू झाली पाहिजे. चित्रपटसृष्टीत जाणे हे माझे स्वप्न कधीच नव्हते. मात्र, चित्रपटासारखे प्रभावी माध्यम हॉकीला मिळाल्यास आमच्या खेळाला पुन्हा सोनेरी दिवस येतील. यामुळेच मी "यशराज फिल्म्स'च्या या प्रकल्पात सहभागी झालो. हॉकीचे पुनरुज्जीवन करण्याचाच आमचा प्रयत्न आहे. "चक दे'मुळे हॉकीला थोडीशी चालना मिळाली, तरी खूप काही साध्य होईल.''
"यशराज', निर्माते आदित्य चोप्रा, दिग्दर्शक शिमित अमीन यांच्याविषयी नेगी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
---चौकट
असा आहे "चक दे...'
1982 मधील दिल्ली एशियाडमध्ये नेगी भारतीय संघाचे गोलरक्षक होते. अंतिम फेरीत भारताचा पाकिस्तानविरुद्ध 1-7 असा पराभव झाला. या दारुण पराभवानंतर नेगी यांच्यावर "मॅच-फिक्सिंग'चा आरोप झाला. त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. यामुळे त्यांच्या कारकिर्दीला व प्रतिमेला डाग लागला. मात्र, याच नेगींनी 2002 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून भारतीय महिला संघाला सुवर्णपदक जिंकून दिले.
---

Subscribe to:
Posts (Atom)