Tuesday, August 21, 2007

"चक दे' ची चर्चा!

"चक दे' ची चर्चा!"चक दे इंडिया' पाहिल्यानंतर मी बऱ्याच परिचित मंडळींना "एसएमएस' केला. "चक दे इंडिया' जरूर पाहा. पोराबाळांनाही घेऊन जा, असा हा "एसएमएस' होता. विशेष म्हणजे "एसएमएस' "सेंड टू मेनी' या ऑप्शनमधून पाठवित असतानाच काही जणांचे रिप्लाय आले.

यात "ओके,' "थॅंक्‍स', "नक्की बघतो,' असा प्रतिसाद होता. यावरून या चित्रपटाविषयी उत्सुकता होती, हे जाणवले.ज्या मंडळींना "एसएमएस' पाठविले, त्यातील बऱ्याच जणांनी "चक दे' पाहिला. पाहिलेल्यांचा प्रतिसादही मिळत आहे. माझ्या पी. डी. देशमुख नावाच्या मित्राने तर सिनेमा सुरू असताना इंटर्व्हल व्हायच्या आधीच "chak de pahtoy..keval chan! असा "एसएमएस' पाठविला. राहूल जोशी नावाच्या मित्राने तर इंटर्व्हलमध्ये बाहेर आल्यानंतर थेट फोन केला. "मुकुंद, अरे फार मस्त आहे सिनेमा. मी एकटा पाहतोय. पण शक्‍य झाल्यास आजच रात्री घरच्या सगळ्यांना घेऊन पुन्हा पाहणार आहे.' जयंत महाबोले यानेही "चक दे' आवडल्याचे एसएमएस द्वारे कळविले.या सिनेमाचे परिक्षण मी "सकाळ'मध्ये लिहीले आहे. आमचा प्रुफरिडर असित हा त्याचा पहिला वाचक. या बहाद्दराने परिक्षण वाचले, त्याला आवडले, त्याने तिकीट काढले, त्याने सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून त्यानेच मला हे सांगितले की, तुझे परिक्षण वाचूनच मी "चक दे' पाहायचे ठरविले!

हेच परिक्षण वाचून आशिष चांदोरकर हा आमचा हॉकीप्रेमी सहकारी सुद्धा "चक दे' पाहणार आहे. त्याच्या रिस्पॉन्सची मला प्रतिक्षा आहे.

तसे पाहिले तर प्रत्यक्ष "चक दे'चा पहून पहिला "रीस्पॉन्स' "मामू' उर्फ श्रीपाद ब्रह्मेकडून आला. परिक्षण द्यायचे नसले तरी त्याने स्वखर्चाने तिकीट काढून "फर्स्ट डे फर्स्ट शो'ला "चक दे' पाहिला. तो सुद्धा भारावून गेला होता.एकंदरीत "चक दे'ची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा चित्रपट यापुढेही गाजेल, याचे कारण "माऊथ पब्लीसीटी'! आता "चक दे' ऑस्करसाठी जावा आणि इतकेच नव्हे तर त्याला "ऑस्कर'ही मिळावे, हीच सदिच्छा!

3 comments:

Devidas Deshpande said...

तुम्ही मराठीत लिहायला लागलात, हे बरे झाले. चक दे मी पाहिला नाही. मात्र त्याबद्द्ल वाचून मला एक शंका येते...‘हिप हिप हुर्रे’ या नितांतसुंदर चित्रपटाशी त्याचे साधर्म्य असावे, ही ती शंका. ऍनिवे, या चित्रपटाबद्दल प्रचंड हवा करण्यात आला आणि अशा प्रकारे हवा केलेल्या चित्रपटांबद्दल पूर्वीचे अनुभव चांगले नाहीत.

Bal Mukunda said...

देवीदास देशपांडे यांच्या कॉमेंटविषयी...

अरे देवीदास, "चक दे' कॉपी केलेला सिनेमा नाही. हा खऱ्याखुऱ्या घटनेवर आधारीत सिनेमा आहे. त्यासाठी तू याच ब्लॉगवरच्या इतर मराठी बातम्या वाच. म्हणजे तुला कळेल. बाकी मी मराठीतच लिहीतो. इंग्रजीत आपले "कर्ता-क्रम-क्रीयापद' अशा पद्धतीने लिहीत असतो. आपल्याला काय इश्‍टाईल-बिश्‍टाईल नाही बुवा....

ब्लॉग चालक, मालक, मुद्रक, प्रकाशक, संस्थापक, वितरक..इत्यादी इत्यादी...

बालमुकुंद
-----

ashishchandorkar said...

Chitrapat na pahata to changla nasava asa lihinaryana fakta tamil chitrapat avadat asavet ani tyamulecha te biased ahet asa vatata.
Forget it Chak De India is great movie and one of the best movie i have seen. Rajanikant naslyamule devidas la to picture avadnar nahi pan tyamule kahi bighadat nahi its great.
Adhikadhik lokani ha picture pahava ani tysathi potdar yani ghetlele shram kharach Koutukaspad ahet. Abhinandan Potdar and keep it up.