Saturday, September 19, 2009

पेजर ते ट्‌वीटर ः कलीयुगातील "संवादा'चे "अवतार'

कसे असते बघा...पूर्वी "पेजर' असलेली मंडळी भाव खायची. "बीप-बीप'झाल्यावर पेजर काढून शायनिंग मारायची. नंतर सर्वांनाच पेजरचा कंटाळा आला.एक रूपया खर्चून फोन करावा लागणार फुकटचा (पण पैसा विकतचा जाणार) अशीचीडचीड व्हायची.

नंतर आला मोबाईल. लोक जाम खुश झाले. मोबाईलवाले लै भावमारायचे. "रिंगटोन' मुद्दाम मोठे ठेवायचे. पण नंतर अगदी मोलकरीण, हमाल,रिक्षावाले, अशा सर्वांकडेच मोबाईल आले.

दरम्यानच्या काळात मोबाईलचाहीपब्लीकला "नॉशीया' आला. "रिंगटोन' कितीही मधूर असली, पण ती वाजल्यावरप्रचंड वैताग येतो, असे चित्र सर्रास दिसू लागले. अगदी "एसएमएस' आला तरीजी लोक शायनिंग मारायची, तीच आता "एसएमएस' शीळा झाला तरी बघत नसतात, असेआम्हाला सर्वेक्षणाअंती दिसून आले आहे.

मोबाईलने भाव मारणे जुनेपुराणेहोते न होते तोच "इ-मेल' आले. "पेजर, मोबाईल हुआ तो क्‍या हुआ? तुम्हारेपास "मेल' है क्‍या? ' असे आपल्याला ऐकून घ्यावे लागणार नाही, याचीदक्षता घेत लोक भराभर "आयडी' काढू लागले. काही जणांनी कंपनी आणि स्वतःचेदोन "आयडी' काढले. इतके करून आपण मंडळी थांबतो काय? सबीर भाटीयाचे "मेल'"हॉट' असेपर्यंत आपण तेथे मैलामैली केली. मग "याहू' वाल्यांनी "बोंब'ठोकताच आपण "याहू-याहू' असे म्हणत "याहू पे मैं भी हू...' असे घोषवाक्‍यघोकत बसलो. दरम्यान "रिडीफ' वाल्यांची थोडी क्रेझ येऊन गेली. मग यालाटेवर स्वार झाले ते "जी मेल'! "जी हॉं, मै जी-मेल भी हू' असे म्हणत आपणतेथे "जी-जी-' करू लागलो. पूर्वी "जी-मेल' वाल्यांनी मैलामैली (फुकटची)करणाऱ्यांची भाऊगर्दी नको म्हणून 50 नव्या लींक देण्याचे "कॉपीराईट'आद्यजीमेलधारकांना प्रदान केले. (आता जी-मेल वाले सुद्धा फुकट अकाऊंट ओपनकरू देतात..बहुतेक त्यांना "आयसीआयसीआय' वाल्यांचे मार्केटींगबहाद्दरभेटले असतील...)

अशाप्रकारे आपण मंडळींनी सर्वच "इ-मेल पुरवठादारांकड'खाते थकविले. (जीबीचा कोटा संपल्याचा -निर्वाणीचा - इशारा देणारा संदेशआल्याशिवाय आपण मेल डीलीट करीत नव्हतो. माझ्या माहीतीत सचिन तेंडुलकरच्यावन-डे आणि टेस्ट क्रिकेटमधील धावांइतकेच "मेसेज' इनबॉक्‍समध्ये असलेलेमेल-चालक आहेत...)

मैला-मैली करून मंडळी वैतागत असतानाच ब्लॉग' आला. आपलाब्लॉग असावा, तो लोकांनी वाचावा, त्यावर "कॉमेंटा' टाकाव्यात असे लोकांनावाटू लागले. मग कुनीपन उठून ब्लॉग काठू लागले. नंतर ब्लॉगचालकांनाब्लॉगवर पोस्ट टाकण्याचा, त्यांनी त्या टाकल्यातरी लोकांना त्यावाचण्याचा, वाचल्या तरी "कॉमेंटा' टाकण्याचाही वैताग येऊ लागला. ब्लॉग"ब्लॉक' होण्याची वेळ आली आहे. अर्थात काही मंडळी निर्धाराने ब्लॉग अपडेटकरीत असतात आणि त्यांचा कंटेट सुद्धा भन्नाट असतो.

पण ब्लॉग चालविणे हामोठाच उद्योग असतो. हल्ली वेळ ही "डायनोसॉर'च्या सांगाजड्यासारखी दुर्मिळअसल्यामुळे कुणालाच सापडत नसते. शेवटी रिकामटेकड्यांना वेळ मिळणे अवघडचअसते.)ब्लॉग जुनेपुराणे होताच..सोशल नेटवर्कींगचे पेव फुटले होते."ऑर्कुट' आपणे दळण कुटत बसायचे दिवस आले. ती क्रेझ झाली. मग "फेसबुक'आले. मात्र या दोन्ही गोष्टी मेंटन करण्यासाठी वेळ तुलनेने जास्त लागतो.त्यामुळे "शॉर्ट-बट-स्टीव' असे "ट्‌वीट' आले.येथे फकस्त 140 चॅरॅक्‍टरचीमर्यादा आहे. ती बघताबघता फस्त होते. आणि अपडेट पण लगेच होते.

मंत्रीमहोदय शशी थरूर यांनी "ट्‌वीटर' जाम फेमस केली आहे. त्यामुळे सध्याट्‌वीटरची चलती आहे.एकंदरीत काय तर हा कलीयुगाचा महिमा आहे. "गळाभेट'घेण्याचे दिवस संपले आहेत. आधुनिक संवादाची (?) अशी नवनवीन साधने येतजाणार आणि आपण त्यामागे धावणार. भेटी होतात. पाचवी पुजणे, बारसे, जावळ,मुंज, सोडमुंज, साखरपुडा, लग्न, मग नवविवाहीत जोडप्यांच्या दोन हातातूनझालेले चार हात,,मग पुन्हा पाचवी पुजणे....असा क्रम!!!!!!

कालांतरानेसहस्त्रचंद्रदर्शन, पंच्याहत्तरी, साठी, अशी उलटगणतीही होत असते. पण मंगलकार्यालयात भेटलेली मंडळी जेवणापुरतेच हात मोकळे ठेवतात. एरवी कुणीमोबाईल करीत असते किंवा त्यांना आलेला तरी असतो....)काय करणार? शशी थरूर,सबीर भाटीटा, नोकीया-मोटोरोला वाले नव्हे तर हा "कली'च दोषी आहे....

1 comment:

Devidas Deshpande said...

lage raho. chhan lihile ahe. sadhya kaay form madhe disata.